मंठा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात
तळणी प्रतिनिधी ( ता मंठा) : मंठा नगर पंचायत निवडणूकीत शिवसेना १२ , काँग्रेस २ , भाजपा २ राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा निवडून आली. सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास पुन्हा ठेवला. मात्र, भाजपाचे आ. बबनराव लोणीकर व काँग्रेसचे आ. राजेश राठोड यांना आपला प्रभाव दाखवता आला नाही.
वार्ड १ मधून अच्युत आनंदराव बोराडे पक्ष- शिवसेना मते ५१३ , वार्ड २ मधून गुलाब महमद खाॅ बाज पठान पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस मते २२७ , वार्ड ३ मधून जलील साजेद शेख पक्ष- काँग्रेस मते ३०३ , वार्ड ४ मधून नंदा उत्तमराव राठोड पक्ष- शिवसेना मते ६९५ , वार्ड ५ मधून दीपक आसाराम बोराडे पक्ष- शिवसेना मते ३९१ , वार्ड ६ मधून यमुना शेषराव दवणे पक्ष- भाजपा मते ३०० , वार्ड ७ मधून छाया अरूण वाघमारे पक्ष- शिवसेना मते ३९२ , वार्ड ८ मधून अशोक रावसाहेब खंदारे पक्ष- काॅग्रेस मते ५९३ , वार्ड ९ मधून इरमसबा रशीद खाटिक पक्ष- शिवसेना मते ५५४ , वार्ड १० मधून सचिन मिना बोराडे पक्ष- शिवसेना ( बिनविरोध ) , वार्ड ११ मधून कय्यूम खयुम्म यासीन बागवान पक्ष – शिवसेना मते ५०६ , वार्ड १२ मधून वंदना वैजनाथ बोराडे पक्ष- शिवसेना मते ९८६ , वार्ड १३ मधून सौ. मिरा बालासाहेब बोराडे पक्ष- शिवसेना मते ५१० , वार्ड १४ मधून सौ. सुषमा प्रदीप बोराडे पक्ष शिवसेना मते ५५८ , वार्ड १५ मधून सौ. सरोजा प्रल्हाद बोराडे पक्षर शिवसेना मते ३२९ , वार्ड १६ मधून सौ. शोभा प्रसाद बोराडे पक्ष – भाजपा मते ४९२ , वार्ड १७ मधून विकास रेणूकादास सूर्यवंशी पक्ष- शिवसेना मते ३४३ हे उमेदवार विजयी झाले.