भोकरदन तालुका

जागा लालपरीची दादागिरी अवैद्य वाहनांची,पोलीस का करताय दुर्लक्ष

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून अवैध प्रवासी वाहनांना उत आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अवैध प्रवासी वाहनचालकांच्या पथ्थ्यावर आला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गत दोन महिन्यांपासून एसटीची सेवा ठप्प असून संप संपता संपत नसल्याने एसटीचे लाखो प्रवासी हैराण झाले आहेत.
मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फुट पडत असून एसटीचे बहुतांश कर्मचारी कामावर रुजू होत आहे. यामुळे भोकरदन शहरातील एसटी बस सेवा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. शहरातून दिवसाला अंदाजे वीस ते पंचवीस एसटी बस धावत आहेत. यामुळे परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


यादरम्यान अवैध प्रवासी वाहनचालकांची दादागिरी शहरातील बस्थानक परिसरात दिसून येत आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत असताना शासनाने अवैध प्रवासी वाहतूकीला परवाणगी दिली. परंतु या संधीचा गैरफायदा घेत अवैध वाहनचालकांनी प्रवाशांची जास्तीचे भाडे आकारून लुट केली. मात्र आता शहरात एसटी सेवा पूर्वपदावर येत असताना अवैध प्रवासी वाहचालक मनमानी करताना दिसून येत आहे. अवैध प्रवासी वाहनचालकांनी बसस्थानकालाच आपला अड्डा बनवला असून येथेच तळ ठोकला आहे. विशेष म्हणजे थेट बसस्थानकातून प्रवासी पळवण्याइतपत त्यांची मजल गेली आहे. याविषयी भोकरदन बस्थानकातील वाहतूक नियंत्रक डी.डब्लु.देशमुख यांनी आठ दिवसांपूर्वी भोकरदन पोलिसांत तक्रार दिली आहे. परंतु या प्रकरणी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याने अवैध प्रवासी वाहनचालकांची दादागिरी चालूच आहे. हे वाहनचालक आपले वाहन ऐन मुख्य रस्त्यावर लावून प्रवासी भरत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे तसेच रहदारी करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागत आहे.


शासनाच्या नियमानुसार बस्थानकापासूनच्या २०० मीटर अंतराच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहन पार्क करणे तसेच प्रवासी भरण्यास मनाई आहे‌. परंतु भोकरदन शहरात तर थेट बसस्थानकातून प्रवासी भरले जात आहे. यामुळे या नियमाला हरताळ फासली जात आहे. तरी पोलिस या प्रकाराकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने अवैध प्रवासी वाहनचालकांची दादागिरी आणखीनच वाढली आहे. यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन या प्रकरणाची दखल घेण्याची नितांत गरज आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!