परतूर तालुका

पर्यावरणाचा -हास होत असल्यामुळे प्रत्येक महिलांनी एक तरी झाड घरी जोपासावे – सौ.अग्रवाल

अग्रवाल परिवाराच्या वतीने हॉटेल अतिथी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

images (60)
images (60)

दिपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क

हॉटेल अतिथी येथे परतूर शहरातील महिला साठी कोरोना नियमाचे पालन करीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आरती मोहन अग्रवाल , छाया अनिल अग्रवाल, निशा तेजस अग्रवाल यांनी परतूर येथील हॉटेल अतिथी येथे आयोजित केला होता.
पर्यायवरणासाठी घरातील प्रत्येकानी एक एक झाड लावावे म्हणून मकर संक्रांतीचे वाण भेट म्हणून झाडासाठी कुंड्या ह्या भेट म्हणून देण्यात आल्या. परतूर शहरातील सर्वच स्तरातील महिलांनी या मध्ये सहभाग नोंदविला होता. प्रत्येक महिलांसाठी कोविड नियमाचे पालन करीत आसन व्यवस्था व नाष्टा सोय ही अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आली होती.
महिलांसाठी फोटो सेशन करीता सेल्फी पॉईंट सुद्धा लावण्यात आले होते.
सदरील कार्यक्रम हा परतूर शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सौ.आरती अग्रवाल, सौ.छाया अग्रवाल, सौ.निशा अग्रवाल, सौ.सोनू केजरीवाल, सौ.सीता अग्रवाल, सौ.हेमा अग्रवाल, सौ.स्वाती अग्रवाल, सौ.रोशनी अग्रवाल, सौ.कंचन अग्रवाल, सौ.पद्मा अग्रवाल यांच्या सह अनेक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता।

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!