भोकरदन तालुका

जिल्हा परिषद सदस्या सौ.मनिषा जंजाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी


प्रतिनिधी : भोकरदन

images (60)
images (60)


भायडी सर्कलच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ . मनिषा जंजाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी तसेच भाजपाचे केशव जंजाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकरदन च्या वतीने प्रसिद्धपत्र देण्यात येते की , भायडी जिल्हा परिषद गटातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सौ . मनिपा जंजाळ या सन 2017 सालच्या जि . प . सार्वत्रिक निवडणुक लढवून निवडुण आल्या होत्या . मात्र त्यांनी 2019 साली झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या विरुद्ध तसेच नियमित पक्षाविरोधी भुमिका घेतल्यामुळे व कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार त्यांची पक्षातुन हकालपट्टी करून पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे . तसेच आता सन 2022 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सौ . मनिषा जंजाळ व केशव जंजाळ ज्यांनी 2019 मध्ये अधिकृतपणे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला असतांना देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याचा संभ्रम निर्माण करित आहे . यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरील जि.प. सदस्य व त्यांचा दिर यांचे सोबत कोणताही संबंध नाही . हे मी तालुकाध्यक्ष या नात्याने जाहिरपणे स्पष्ट करित आहे .

लेटर पॅडवर रमेश उत्तमराव सपकाळ ( तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकरदन ) अशोक पवार ( जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस जालना ) संग्रामराजे देशमुख ( जिल्हासरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस जालना ) अंकुश जाधव ( तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस भोकरदन ) यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!