शेतात गांजा लाऊद्या परतूरात रयत क्रांती संघटनेची मागणी
दिपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क
रयत क्रांती संघटचे युवक जिल्हाध्यक्ष गजानन राजबिंडे यांनी नुकतेच तहसीलदार परतूर यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी असे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निसर्गाचा सतत होणाऱ्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्येत दिवसें दिवस वाढ होत आहे अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन कापूस अशा पिकांचे अतोनात नुकसान होत असते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात आहे शेतकरी नुकसानीमुळे चिंतातुर असताना शासनाने शेतकऱ्यांना प्रति गुंठा १०० रुपयाची तुटपुंजी मदत घोषित केली आहे. ,परंतू शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही सध्या झालेला खर्चही निघणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी होणार नाहीत.पुढे असे आहे की, कोरोना महामारी काळात शासनाला महसूल मिळावा म्हणून केवळ ४५ दिवसात सर्वसामान्य जनतेचा विचार न करता मद्यविक्री व्यावसायिकांना परवानगी देऊन कहरच केला. खरेदीसाठी मोठ्या मोठ्या रांगा लागत होत्या त्यामुळे गावांमध्ये कोरणा पोहोचला असाही अरोप यात आहे . अनेक लोक मृत्यू पावले राज्य सरकारला फक्त महसूल गोळा पाहीजे एवढेच सर्व सामान्य जनतेचे काय कळत नाही , अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीमालाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी किमान ५०,००० हजार रुपये नुकसान भरपाई देणे सरकारने अपेक्षित होते सरकारने तुटपुंजी मदत घोषित करून एक प्रकार शेतकऱ्याच्या परिस्थितीची चेष्टाच केली आहे सुरुवातीला शेतीसाठी घेतलेले सावकारी कर्ज आणि त्यात कोरोना महामारी आलेले संकट आणि आला तर अतिवृष्टी झालेल्या पिकाचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी पूर्णता खचला आहे. त्यांना उभारी देण्यासाठी ५०,००० हजार रुपये नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते .त्यामुळे शेतकरी मात्र घेतलेल्या कर्ज कसे फेडावे या विवंचनेने असल्यामुळे हतबल होऊन शेतकरी आत्महत्या करु शकतो ? आत्महत्या करून मेल्यावर दोन लाखची मदत देण्यापेक्षा त्याला इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जागता यावे. आता तर राज्य सरकारने किराणा दुकानात मध्ये विक्रीची परवानगी दिली आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष गजानन राजबिंडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार परतूर यांच्याकडे केलेले आहे.