परतूर तालुका

रमाबाई आंबेडकर ,एक प्रेरणा स्त्रोत -सुरेश पाटोदकर.

पाटोदा [ माव ] वार्ताहर ,
रमाबाई आंबेडकर यांचे सर्व जीवन त्यागाचे व समर्पणाचे होते. अनंत अडचणींचा सामना करीत धिरोदात्तपणे रमाबाईंनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली. त्यांचे संपुर्ण जिवन आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. असे प्रतीपादन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी केले.

images (60)
images (60)

श्री समर्थ मा.विद्यालयात स्व.लता मंगेशकर यांना श्रध्दांजली व रमाई आंबेकर यांना जयंती निमीत्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्व.लतादिदीना श्रध्दाजंली अर्पण केली.शिक्षक विद्यानंद सातपुते यांनी स्व. लतादिदी व रमाई आंबेडकरांचे जिवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगुन त्यांचेकडुन आपण प्रेरणा घेतली पाहीजे असा आग्रह केला.

प्रास्ताविक धनंजय जोशी तर आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व कर्मचारी ऊपस्थीत होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!