माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चि.प्रशिक गायकवाड यांच्या वाढ दिवसा निमित्त गोरगरीब अनाथ मुलांना फळे वाटप
दिपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क
सन ऑफ आंबेडकर परतूर ग्रुपचे सनी गायकवाड यांचे चिरंजीव प्रशिक गायकवाड यांच्या वाढदिवसाचा आगाऊ खर्च टाळून रेल्वे स्टेशन परिसर, शासकीय रुग्णालय परतुर परिसरातील गोरगरीब अनाथ मुलांना त्यांच्या वाढ दिवसा निमित्त अल्पोहर चिवडा ,बिस्कीट, केळी, चिकू ही फळे वाटप करण्यात आली. वाढ दिवसा निमित्त समाजाला आगळा वेगळा संदेशही त्यांनी दिला. तसेच माता रमाई जयंती उत्साहात साजरी करून हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक कामात अग्रेसर पद्धतीने परतूर शहरात सनी गायकवाड यांनी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली. आणि त्याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलाचा वाढ दिवसाचा अवाढव्य खर्च न करता साध्या पद्धतीने चि.प्रशिक गायकवाड याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून नितीन साळवे ,शुभम वाहुळ, तसेच गायकवाड परिवारातील सर्व सदस्य ,व सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतूरचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.