दिवाळी अंक २०२१परतूर तालुका

सेवालाल महाराज सार्वजनिक जन्मोत्सव समितीची कार्यकारणी जाही

sms 010921
atul jiwalers1508

अध्यक्ष कैलास चव्हाण , तर सचिव प्रमोद राठोड

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

परतुर सार्वजनिक सेवालाल महाराज जयंती जन्मोत्सव २०२२ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सतगुरू सेवालाल महाराज जयंती १५ फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येने समाज बांधव जयंती साजरी करणार आहे. या बैठकीमध्ये अध्यक्ष पदी पत्रकार कैलास चव्हाण तर सचिव पदी प्रमोद राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी सुनिल राठोड, सहसचिव पदी अर्जून राठोड, सहसचिव पदी विलास राठोड, कोषाध्यक्ष पदी संजय चव्हाण, सहकोषाध्यक्ष पदी सचिन चव्हाण, संयोजक पदी किशोर जाधव, सहसंयोजक पदी राहूल राठोड, कार्यवाहक पदी राहूल नारायण आढे, सहकार्यवाहक पदी अमोल पवार, प्रसिद्धी प्रमुख पदी किरण आढे, तसेच सदस्य पदी पवन आढे, सचिन पवार, सचिन आढे, अविनाश राठोड, इंजी गणेश चव्हाण, रवी आढे, राहूल चव्हाण, डॉक्टर मनोज राठोड, इंजि.प्रशांत जाधव, वैभव राठोड, इंजि.कुलदीप राठोड, इंजि.राहूल रोहिदास राठोड सर्व समितीची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी आदी बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!