परतूर तालुका

परतूरात स्व. लता मंगेशकरांना चुमुकलीची अनोखी श्रद्धांजली !

images (60)
images (60)

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

येथील स्वरा योगेश बरीदे या चिमुकल्या विद्यार्थिनीने स्वरलता,भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांची प्रतिमा रेखाटून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या मधुर आवाजाने केवळ भारतातीलच नव्हे तर अवघ्या जगातील रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गान कोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. लता दीदीच्या निधनाने भारतासह संपूर्ण जग हळहळले.ठिकठिकाणी लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहरातील एका शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या स्वरा बरीदे या चिमुकल्या विद्यार्थिनीला लता दिदींच्या जाण्याने अतीव दुःख झाले. स्व.लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी असा विचार स्वराच्या मनात आला.

स्वराला बालपणापासूनच चित्रकलेची आवड आहे.घराच्या अंगणात ती दररोज आकर्षक व प्रसंगानुरूप रांगोळी काढते.स्व.लता दिदींची प्रतिमा रेखाटून तिने श्रद्धांजली अर्पण केली आहे.योगेश बरीदे (स्वराचे वडील)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!