जालना : शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी
जालना प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या 392 व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ प्रणित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शिवपुजन, जिजाऊ वंदना व प्रबोधन असा अभिवादन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी पाळणा म्हणून छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या स्मृती जागृत केल्या. भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालयात आयोजित अभिवादन सोहळ्यात प्रारंभी प्रतिमा पूजन करून सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रा .डॉ. बप्पासाहेब मस्के यांनी आज मराठा समाज शैक्षणिक, व्यावसायिक व औद्योगिक दृष्ट्या सशक्त होणे गरजेचे असून आपलं दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांनी प्रगतीचा दृढ निर्धार करावा. अशी अपेक्षा प्रा .डॉ.बप्पासाहेब मस्के यांनी व्यक्त केली. प्रा. राजेंद्र मोरे व प्रा .राजेंद्र भोसले यांनी यावेळी शिवचरित्रावर प्रकाश टाकला. महिलांनी सामुहिक रित्या शिवजन्माचा पाळणा गाईला. प्रा. प्रशांत तेलगड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. सोपानराव तेलगड, वसंतराव मस्के ,भरत मानकर ,संतोष गाजरे, विजय वाढेकर, दत्तात्रय कपाळे प्रा. तौर ,प्रा.दिलीप सपाटे,शीतल तनपुरे, वर्षा मनोज देशमुख, दिपाली दाभाडे , कल्पना घुगे, यांच्यासह समितीचे पदाधिकारी महिला व शिवप्रेमींची उपस्थिती होती.