भोकरदन तालुका

जळगाव सपकाळ येथे शंकरपटाचा थरार


जळगाव सपकाळ,:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे गुरुवारी शंकरपटाचे अायोजन करण्यात अाले होते यामध्ये एकुण ७७७७७ रुपयांचे बक्षिस ठेवण्यात अाले.

images (60)
images (60)


यावेळी शंकरपटाला जालना जिल्हयासह औरंगाबाद,बुलडाणा,जळगाव या परजिल्हयातील बैलजोडया अालेल्या होत्या त्यामुळे शंकरपटाला दहा वर्षानंतर प्रथमच जळगाव सपकाळ परिसरात सुरुवात झाल्याने पट शौकीनांनी मोठया प्रमाणात हजेरी लावुन शंकरपटाचा अानंद लुटला त्यामुळे मोठया प्रमाणात शंकरपटाचा थरार पहायला मिळाला.
गुरुवारी सकाळी १० वाजता शंकरपटाचे उदघाटन करुन पटाला सुरुवात झाली यावेळी गावातील शिवाजी बापु सपकाळ,विष्णु सपकाळ चेअरमन,अार.ए.सपकाळ,डाॅ.हेमंत सपकाळ,केतन साळवे,डाॅ.शालीकराम सपकाळ,पप्पु सपकाळ,बन्सी वर्पे,डाॅ.गोकुळ सपकाळ,साहेबराव नेमाने,बाळु गव्हांडे,दत्तु सपकाळ,दिपक मुठ्ठे,जि.एस. सपकाळ,गजानन सपकाळ,यासह ग्रामस्थांची उपस्थीती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!