ऑस्ट्रेलिया रिटर्न केशरखाने यांचा सत्कार
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
ऑस्ट्रेलिया येथे सहा वर्ष संगणक अभियंता म्हणून काम करत परतूर येथील सुपुत्र भारतात परतल्यावर त्यांचा कुटूंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
परतूर येथील भगीरथ भारतराव केशरखाने हे ऑस्ट्रेलिया येथील सिडनी शहरात इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून मागील सहावर्षा पासून काम करत होते. दि 19 रोजी सहा वर्षे पूर्ण करून सपत्नीक ते भारतात परतले या बद्दल बरीदे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भगीरथ यांनी अंबाजोगाई येथून आपले अभियंताचे शिक्षण पूर्ण केले आहे. परतूर येथील बरीदे परिवाराचे ते भाचे आहेत. परतूर येथे पोहचल्यानंतर गटविकास अधिकारी नारायण बरीदे व पत्नी प्रभावती बरीदे यांनी त्यांचा सत्कार केला या वेळी सहाशिक्षक रमेश बरीदे, सोनुभाऊ बरीदे,पांडुरंग कानपुडे,बाळू धारूकर, लक्ष्मीकांत माने,नागेश केशरखाने , श्रीमती शोभा बरीदे,सकाळ चे तालुका बातमीदार योगेश बरीदे आदी उपस्थित होते.