नगर सेवक असतांना शहराच्या विकासासाठी करोडो रुपये निधी आणला जर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाल्यास अनेक पट्टीने विकास निधी अनेल – महोन अग्रवाल
दिपक हिवाळे/परतूर न्युजनेटवर्क
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून मंजूर करून आणलेल्या परतुर शहरातील सातोनकर मळा भागातील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अग्रवाल पुढे म्हणाले की, शिवसेनेचा नगरसेवक असतांना परतुर शहराच्या विकासासाठी करोडो रुपयांचा फंड आणून विकास कामे केली नागरिकांनी सहकार्य केल्यास शिवसेनेचा नगराध्यक्ष परतुर नगरपालिकेत गेल्यास परतुरच्या विकासासाठी अनेक पट्टीने फंड आणला जाईल, परतूर शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून शहरातील नागरिकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे असेही जाहीर आव्हान अग्रवाल यांनी केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड ,तालुकाप्रमुख अशोकराव आघाव ,शहर प्रमुख विदूर जईद, शिवसेना युवा नेते महेश नळगे ,सुदर्शन सोळंके,बाळू गाते, संदीप पाचारे, दिपक हिवाळे, विकास खरात, संदीप शिंदे ,सुरेश पाटील, रामा घाडगे ,सुंरूग पाटील, बाजीराव गोरे, परमेश्वर पाचारे, व्यंकटेश सरकटे, अशोक गांगुर्डे, बालाजी कांबळे, कैलास सर्जे, शिंदे संतोष, व कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते सदरील रस्त्याचे काम मोहन अग्रवाल यांनी मा. नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधी द्वारे मंजूर करून आणले आहे.