अंबड तालुका

जालना: नववधुला नेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच घेऊन आला नवरदेव .

अंबड प्रतिनिधी

images (60)
images (60)


घोड्यावर बसून ऐटीत डिजेच्या धमाकेदार आवाजात समोर नाचणारे मित्र व नातेवाईकांच्या गराड्यात येणारा नवरदेव आपण नेहमीच बघतो. पण स्वप्नातला तो राजकुमार चक्क हवेतून हेलिकॉप्टरने येऊन नवरीला त्याच हेलिकॉप्टर मधून घेऊन जाणारा नवरदेव बघितलाय?

जालना जिल्ह्यातील अंबडचे राम लांडे यांनी ही आपली हौस करून हेलिकॉप्टरने येऊन त्यांच्या नव्या नवरीला हेलिकॉप्टरनेच आपल्या घरी नेलंय. हौसेला मोल नसते म्हणतात ना…राम लांडे यांनी ही आपली हौस करून हेलिकॉप्टरने त्यांच्या नव्या नवरीला हेलिकॉप्टरनेच आपल्या घरी नेलंय. राम लांडे हे शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत. आपल्या लग्नात काही आगळे वेगळे करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. मग त्यांनी त्यांच्या लाडक्या नवरीला हवेतून हेलिकॉप्टर मधून  घरी नेले आणि हो घरी जाण्यापूर्वी अंबडच्या मत्योदरी देवी आणि डोंगरावर असलेल्या स्वयंभू महादेव मंदिरावर या नवदांप्नत्यांनी पुष्पवृष्टी केली. हेलिकॉप्टरमध्ये बसायचा विचार ही कधी केला नव्हता पण लग्नात नवरीला योग आलाय.

स्वप्न होत ते पूर्ण झालं, आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण ठरलाय असं नववधू ने यावेळी म्हटलं दरम्यान, औरंगाबाद तालुक्यातील करमाड ते जालना जिल्ह्यातील अंबड असा हा नवरा – नवरीचा हेलिकॉप्टरने प्रवास जिल्ह्यातील मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!