भोकरदन तालुका

जळगाव सपकाळ वासियांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण


जळगाव सपकाळ:— भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील ग्रामस्थांच्या वतीने छञपती शिवाजी महाराज स्मारका जवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनास राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे त्याच अनुषंगाने जळगाव सपकाळ येथील ग्रामस्थांनी संभाजीराजे यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवला असून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ हे उपोषण करण्यात आले

images (60)
images (60)

या उपोषणास ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती यावेळी जी एस सपकाळ, आर ए सपकाळ ,रमेश सपकाळ, डॉक्टर हेमंत सपकाळ ,मधुकर सपकाळ ,पांडुरंग सपकाळ ,माधवराव सपकाळ, दामू अण्णा सपकाळ , दिपक सपकाळ,डाॅ.गोकुळ सपकाळ,बंकु सपकाळ,सखाराम सपकाळ ,शिवाजी पुंगळे ,पप्पू सपकाळ ,भाऊसाहेब सपकाळ ,भगवान सपकाळ, साहेबराव नेमाने ,सोनाजी हिवाळे ,गोकुळ सपकाळ ,शिवा दौड ,विठ्ठल दौड ,सतीश सपकाळ ,गणेश सपकाळ सुभाष सपकाळ आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!