परतूर तालुका

हभप रूपालीताई सवने बनल्या महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार ! बालवयापासूनच जोपासला हरिनामाचा जप …


महिला दिन विशेष झी टॉकिज वाहिनीवर समाजप्रबोधन कीर्तन
 
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
बालवयात शालेय जीवनात शिक्षण घेत असतांना हरिनामाचा जप घरात जपत त्यातून महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार घडत स्त्री कर्तुत्वावर आपले नाव नामवंत कीर्तनकार म्हणून स्थान मिळवले आहे. महिला दिनी हभप रूपालीताई रामेश्वर सवने यांचे नाव ख्यातनाम कीर्तनकार म्हणून समोर येत आहे. त्यांचे महिला दिनी विशेष झी टॉकिज वाहिनीवर दी. ७ ते ९ मार्च दरम्यान तीन दिवस संध्याकाळी सहा वाजता समाजप्रबोधन कीर्तन होत आहे.
 
भगवताचा-र्य हभप रूपाली रामेश्वर सवने यांचा जन्म २१ जून १९९५ ला पैठण तालुक्यातील टाकळी (अंबड) येथे झाला. वडिल राजेंद्र मुरलीधर नरके वारकरी घराण्याचे असल्याने  हभप रूपालीताईवर घरातून अध्यात्माच्या संस्काराचे बीजरोपण झाले. सातवी पर्यंत प्राथमिक शिक्षण गावात झाले तर पुढे पदवी पर्यंत शिक्षण हे पैठण येथे झाले. शालेय शिक्षण घेत असतांना भाषनाची आवड असल्याने हभप रूपालीताई शाळेत असतांना तालुकस्तरीय जिल्हास्तरीय आणि  राज्यस्तरीय स्पर्धेत परितोषिक मिळवले. लेक वाचवा लेक शिकवा, पर्यावरण संवर्धन, झाडे लावा झाडे जगवा, स्त्री भ्रूण हत्या, व छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रामता जिजाऊ या विषयावर गावोगावी भाषण करून जनजागृती समाजप्रबोधन केले. कमीवायात कर्तुत्व पाहून तत्कालीन सरकार मध्ये शिक्षणमंत्री असतांना मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते गौरव केला. तसेच सामाजिक फाउंडेशनच्या वतीने सत्कार झाले.  भाषणाचे शैली व कला पाहून घरातून वारकरी संप्रदायचे संस्कार असल्याने कीर्तनातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत वयाच्या १७ व्या वर्षी पहिले कीर्तन केले. समाजातून प्रतिसाद मिळत गेला. आणि कीर्तनाला सुरुवात झाली. वयाच्या विसाव्या वर्षी जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात दैठना खुर्द येथील हभप भगवताचा-र्य रामेश्वर महाराज सवने यांचाशी दि २१ फेब्रुवारी २०१५ रोजी विवाह झाला. आणि पुन्हा अध्यात्मि जोडीदारांनी समाज प्रबोधनाला धार मिळत गेली. त्यांचे मार्गदशन मोलाचे ठरले. आज दोघे समाजात पती पत्नी श्रीमद भागवत कथा, श्रीराम कथा, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र्य कथा, कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश इतर राज्यात वारकरी संप्रदायचा प्रचार आणि प्रसार करत आहे. कर्तबगार पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो त्याच प्रमाणे एका कर्तबगार स्त्री मागे एका पुरुषाचा हात असल्याने आज हभप रूपाली रामेश्वर सवने यांचे कर्तुत्वचा ठसा निर्माण केल्याने महिला विशेष दिनी विशेष हभप रूपालीताई सवने यांचे नाव घ्यावे लागते.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!