पहिली राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत परतूरच्या सोतोकान कराटे टिमचा झेंडा..
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व किनवट येथील लक्ष्मीबाई यशीमोड सेवाभावी संस्था किनवट च्या विद्यामाने दि. ०५ व ०६ रोजी किनवट येथील क्रिडा संकुल साई मंदिर परिसरात सकाळी १०,वा.आयोजित करण्यात आले. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन मा.स.जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजारा यांच्या हस्ते करण्यात आले. यास्पर्धेला पंधरा जिल्ह्यातील कराटे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत परतूर च्या सोतोकान कराटे डो इंडिया. संघाने सहभाग नोंदवत बाजी मारत.ट्राँफी आपल्या नावे केली. व मेडल प्राप्त करण्यात यशस्वी झाले.सहभागी कराटे विध्यार्थी वैष्णवी घोडे.दुर्गा शेळके. वैष्णवी शेळके. साक्षी नरवैय.शिवानी पाल.आरती शिंदे.अभिषेक पावले. अजय गिरी. अब्बूजर शेख. रेहान शेख. दिव्या वाकळे.भक्ती कोरडे. श्रावणी लोहगावकर.साधना सोळंके. विक्रम सोळंके.अजलान शेख.राज वाघमारे.शे.मोहम्मद मलिक मोहम्मद मुराद.पुर्थवीराज कोरके.वैभव येडे. वेदांत कुकडे. विक्रम रनबावळे.अर्णव तापडीया.रूद्र घाडगे.हर्ष बागुल.यांनी आपला बेस्ट देत सर्वांनी मेडल प्राप्त केले. यांना कराटे मास्टर माणिक जैस्वाल व रोहित जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.किनवट येथील स्पर्धे चे आयोजक संदिप यशीमोड यांनी परतूर कराटे टीम व कोच यांना ट्राँफी,देऊन सन्मानित केले.
परतूर येथील नागरीक, व,पालक यांनी किनवट येथून परत आल्या नंतर परतूर रेल्वे स्टेशनवर माणिक जैस्वाल, रोहित जैस्वाल,व सर्व टिमचे हार घालून ढोल ताषेच्या गजरात स्वागत केले.