भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात बेमोसमी पावसाची सुरुवात; शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जालना / प्रतिनिधी

images (60)
images (60)

भोकरदन शहरासह तालुक्यात अनेक भागामध्ये कालपासून बेमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीवर आलेले हरभरा , गहू,कांदेसहीत अनेक पिके जमीनदोस्त झाली आहे.त्यामुळे शेतकरी मात्र चांगलाच धास्तावला आहे.तालुक्यात विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. शहरासह परिसरात पारध,रेणुकाई पिंपळगाव,दानापूर, वालसावंगी,केदारखेडा,बरांजळा, वाकडी, कुकडी, तळेगाव, विरेगाव आदि ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.
त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.यासह बदलत्या वातावरणामुळे पुन्हा साथीचे आजारात वाढ होण्याची शक्यता आहे.ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट , गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला.

तालुक्यात अनेक ठिकाणी शेकडो हेक्टरवरील हरभरा , गहू व कांदा इतर पिके जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.यामुळे खरीप हंगांमा सोबतच आता रब्बीचे उत्पन्नदेखील निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!