मनरेगा सिंचन विहिरीला मुहूर्त मिळेना ,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष !
जळगाव सपकाळ:—ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती थांबावी व रोजगार मिळावा यासाठी शासना मार्फत रोजगार हमी योजनेतुन “मनरेगा” अंतर्गत ग्रामपंचायतीला सार्वजनिक सिंचन विहिरी दिल्या माञ भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील सिंचन विहिरीचे तीन वर्षापासुन भिंजत घोगंडे अाहे.तसेच ग्रामपंचायतीने तीन वर्षात दोनदा नारळ फोडुन फक्त उदघाटनच उरकले पण कामाला अजुन पर्यत त्या सिंचन विहिरीला मुहूर्त काही मिळाला नाही.
जळगाव सपकाळ येथील सिंचन विहिरीला मनरेगा अंतर्गत ८ लाख ६४ हजार रुपये निधी अाहे माञ ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे तसेच अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे सिंचन विहिरीचे ग्रहण सुटता सुटेना.
रोजगार हमी योजनेतुन अनेक जाॅब कार्डधारक मजुरांना रोजगार मिळत नसल्याने शासनाने मनरेगा अंतर्गत रोजगार हमीचे कामे प्रशासना मार्फत मंजुर केले माञ या कामांना प्रशासनातीलच अधिकार्यांनी खो देऊन मजुरांच्या हाताला काम नमिळावे म्हणुन अनेक कामे पेंडीग ठेवलेले अाहेत त्यातच यातुन फायदा होत नसल्याने फक्त रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अण अर्ध्यात अाम्ही असा पविञा घेतल्याने तरच कामे होत असल्याचे निर्दशनास येत अाहे माञ तीन वर्षापासुन पाणीपुरवठा विहीरीच्या कामाचे फक्त उदघाटनच होत अाहे अजुन पर्यत त्या विहिरीचे काम झाले नसल्याने अनेकांना प्रश्न पडला अाहे.
“मनरेगा अंतर्गत होत असलेल्या पाणीपुरवठा विहीरीचे अजुन पर्यत पाच फुट सुध्दा काम झाले नाही माञ संबधीत ग्रामपंचायतीने अधिकार्यांना हाताशी धरुन काही निधी काढला असल्यांची चर्चा गावामध्ये होत अाहे.
“याविषयी ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये सिंचन विहिरी विषयी चर्चा झाली होती माञ ग्रामसेवक व सरपंच यांनी समाधान कारक उत्तर दिले नसल्याने यामध्ये काही अालबेल असल्याचे दिसत अाहे असे ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रियंका पप्पु सपकाळ व अंजु बन्सी वर्पे यांनी सांगितले.
“याविषयी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.