शालेय समिती अध्यक्षपदी जिजाबाई कैलास सपकाळ तर ज्योती गजानन सपकाळ यांची बिनविरोध निवड
जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शालेय समितीची निवड करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते .अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नासेर शेख हे होते.
पालक सभेमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदासाठी जिजाबाई सपकाळ यांचे नाव देऊन त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच ज्योती सपकाळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . सदस्यासाठी वर्गवारी नुसार इच्छुक उमेदवारांच्या चिठ्ठ्या टाकून सदस्यांची निवड करण्यात आली .सदस्यांमध्ये अनिता पंजाबराव सपकाळ, संदीप माणिकराव सपकाळ ,गणेश सांडू राजगुरू, शिवाजी शंकर सपकाळ, सीमा गजानन सपकाळ, रेखा गजानन सपकाळ ,तय्यब सांडू तडवी, राजू रघुनाथ साळवे ,वैशाली प्रदिप सुरडकर ,गणेश हिरामण सोनवणे ,प्रदीप रामराव सपकाळ, ज्योती दत्ताराम सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे शाळेचे मुख्याध्यापक नासेर शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी डॉ.शालीकराम सपकाळ गणपतराव सपकाळ ,दामुअण्णा सपकाळ ,मधुकर सपकाळ,केके सर सपकाळ, माधवराव सपकाळ, डॉक्टर हेमंत सपकाळ ,ओंकारेश्वर सपकाळ, आर ए सपकाळ ,गोकुळ सपकाळ ,सुभाष सपकाळ,पप्पु सपकाळ,बन्सी वर्पे,शामकांत सपकाळ,पालक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागतिक महिला दिनीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी शालेय समितीमध्ये महिलांची निवड झाल्यामुळे सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.