परतूर तालुका

परतूर तालुक्यातील वाटूर येथे हरभरा खरेदीला सुरुवात


परतूर/ प्रतिनिधी
 तालुक्यातील वाटुर येथे शासनाचे नाफेड हमीभाव केंद्र ‘फार्मफ्युचर फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या केंद्र अंतर्गत १५ मार्चपासून ऑनलाईन हरभरा पिकाची नोंदणी केलेली असून खरेदी केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नाफेड केंद्राच्या वतीने हमीभावाप्रमाणे हरभरा खरेदी करण्यात येणार आहे.

images (60)
images (60)


या केंद्राचा फायदा वाटूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल.  त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा व उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून घ्याव्यात असे आवाहन  कंपनीच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमास आयडियल ॲग्रोटेक कंपनी चेअरमन तथा महाफपीसीचे जालना जिल्हा प्रतिनिधी भगवानराव नाना डोंगरे, विक्रम नाना माने, गणपत आबा वारे, सरपंच डॉ. केशरखाने, उपसरपंच बद्रीभाऊ खवणे इत्यादीची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांचे स्वागत फार्मफ्युचर कंपनीचे संचालक डॉ.गोवर्धन भुतेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन कंपनीचे संचालक डॉ. दीपक बहीर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.


या कार्यक्रमात वाटूर हमीभाव केंद्राकडे प्रथम नोंदणी केलेले वाई येथील शेतकरी अर्जुनराव खंडागळे यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, मदन पोहेकर,अतुल खंदारे, भारत उबाळे, प्रसाद हजारे, विष्णु खडेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!