शिवसंपर्क अभियानांर्गत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे परतूर कार्यकर्त्यांच्या भेटीला
दीपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
शिवसंपर्क अभियान अंतर्गत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे परतूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्याच्या भेटीला येत असून त्यांच्यासोबत बोरवली विधानसभेचे संघटक संजय भोसले, उपविभाग प्रमुख पांडुरंग देसाई, मुलुंड उपविभाग प्रमुख दामोधर म्हाञे , दहीसर विधानसभा समन्वयक कीशोर म्हाञे राहणार असून शासनाने केलेल्या विकास योजनाची व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका संदर्भीय बैठकीचे आयोजन शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल उपजिल्हाप्रमुख माधव मामा कदम उपजिल्हाप्रमुख बाबाजी तेलगड व तालुकाप्रमुख अशोकराव आघाव व सर्व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी आज ता. २३/०३/२०२२ रोजी दुपारी ०१ वाजता यशोदा गार्डन हॉटेल रजिस्ट्री कार्यालयासमोर उपस्थित राहावे. असे यानिमित्त जाहीर आव्हान केले आहे.