केन्द्र सरकारने केलेल्या भाववाढ, महागाई विरोधात शिवसेनेच्या धरणे अंदोलनास हजोरोच्या संख्येने उपस्थित रहा – अशोकराव आघाव
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
. केंद्र सरकारने अघोषित अशी महागाईची संचार बंदी गँस, पेट्रोल, डिझेल व इतर जिवनाशक वस्तूही महागाई सामान्य गोरगरीब जनतेवर लादली आहे. त्याविरोधात परतूर तहसिल कार्यालयावर ता.२८/०३/२०२२ सकाळी १०:०० वाजता निदर्शन ,धरणे अंदोलन शिवसेना, युवासेना शिवसेना दलित आघाडी, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात येणार आहे या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख माधव (मामा) कदम, उपजिल्हाप्रमुख बाबाजी तेलगड, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजय कदम, दलित आघाडीचे तालुका प्रमुख मधुकर पाईकराव ,महिला आघाडीच्या भुसारेताई व आदी शिवसेनेच्या मान्यवर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे तरी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी, नागरीकांनी व शेतकऱ्यांनी हजोरोच्या संख्येने उपस्थित राहावे.असे शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोकराव आघाव यांनी दिलेल्या प्रसिध्दी पञकाद्वारे जाहीर अव्हान केले आहे.