परतूर तालुका

केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात परतूरात शिवसेनेचे धरणे आंदोलन


दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
केंद्रातील भाजपा सरकारने महागाईचा हाहाकार माजवत सर्वसामान्यांना झळ पोहचवत सत्तेचा दुरुपयोग करून ईडी ला हाताशी धरून दबाव यंत्रणा राबवत असून पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन निदर्शने उपविभागीय कार्यालया परतूर समोर करण्यात आली. व निवेदन देण्यात आले .दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जबाबदारी झटकत एक प्रकारे सर्व सामान्यांना महागाईचा भडका दाखवत छळण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच या विरोधात जर कोणी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तर सत्तेचा गैरवापर करून ईडीचा धाक दाखवत आघाडीतील नेत्यावर चुकीची कार्यवाही करत आहेत ,केंद्र सरकारचा पिद्दु किरीट सोमय्या खुलेआमपणे पत्रकार परिषद घेऊन महा विकास आघाडीच्या नेत्याच्या विरोधात गरड ओकताना दिसत आहे हे सर्व घटनाबाह्य असून केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग भाजप सरकार करत आहे.
पुढे असे आहे की, पेट्रोल महाग डिझेल महाग व जीवनावश्यक वस्तू महागल्या असून याची सर्व सर्वसामान्य तसेच गोरगरिबांवर परिणाम पडत आहे महागाई वाढवणाऱ्या व केंद्रातील भाजपा सरकारचा या निवेदनाद्वारे आम्ही जाहीर निषेध नोंदवित असून याचा निषेध म्हणून दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशोकराव आघाव माजी सभापती शिवाजीराव शिवतारे ,कीसान सेनेचे उपजिल्हा प्रमुख माउली राजबिंडे,महीला आघाडी तालुका प्रमुख कुंतीकाताई भुसारे ,शहर प्रमुख विदुर जईद , युवासेना शहर प्रमुख सोनाजी भोकरे माजी नगर सेवक लक्ष्मीकांत भैय्या कवडी , उपशहर प्रमुख दिपक हिवाळे , भगवान सुरुंग , विकास खरात , सावता शिंदे, गणेश घाडगे ,महादेव शिंदे ,रामचंद्र काळे, तुकाराम राजबिंडे ,रावसाहेब काळदाते, महालिंग स्वामी, संतोष फोके, रुपेश व्हटकर, शेख मोहम्मद, संदीप पाचारे,व आदी शिवसैनिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!