मनरेगा सिंचन विहिरीचे काम जेसीबीच्या सहाय्याने ?
यंञाच्या सहाय्याने मनरेगा सिंचन विहिरीचे काम?रोजगार सेवक व ग्रामसेवक अज्ञभिन्न कामांची माहितीच नाही.
जळगाव सपकाळ प्रतिनिधी — भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे काम मंजुर अाहे माञ या कामाला अाज मंगळवारी पञकार यांनी भेट दिली असता पोकलेन मशिन यंञाच्या सहाय्याने सिंचन विहिरीच्या कामाला सुरुवात करण्यात अाली होती तसेच दहा फुट काम करुन सिंचन विहीरीवरुन पोकलेन मशीन पञकार पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच मशीन घेवुन निघुन गेले याविषयी रोजगार हमीच्या कामावर देखरेखीसाठी रोजगार सेवकांची नियुक्ती केलेली होती त्यांना या सिंचन विहिरीच्या कामाविषयी विचारले असता काम बंद असल्याचे सांगितले परंतु पञकार यांनी कामावर प्रत्यक्ष भेट दिली असता नेमकेच पोकलेन मशिनव्दारे सिंचन विहिरीचे काम झालेले पहायला मिळाले.
ग्रामीण भागात विकास साधण्यासह रोजगाराची हमी देत महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित झाली या कामावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवकाला मदत म्हणुन प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभेतुन रोजगार सेवकांची निवड करण्यात अाली अाहे माञ जळगाव सपकाळ येथील रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीच्या कामावर रोजगार सेवकच उपलब्ध राहत नसल्याने विहिरीचे काम मजुराने नहोता मशिन यंञाच्या सहाय्याने सुरु अाहे माञ याची साधी माहिती रोजगार सेवकाला सुध्दा माहित नसल्याने सिंचन विहिरीच्या कामात मोठा घोळ कर्मचारी व अधिकारी यांच्या संगनमताने होत अाहे की काय असे दिसुन येत अाहे.
“रोजगार हमीच्या सिंचन विहिरीच्या कामावर बोगस मजुर दाखवुन रोजगार हमीच्या मस्टरव्दारे कामावर हजर असल्यांचे दाखवुन काही विहीरीच्या कामाची बिले रोजगार सेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी काढली असल्याचे निर्दशनास अाले अाहे. त्यामुळे सदर कामाची तपासणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी करावी व चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत अाहे.
“या सिंचन विहिरीच्या कामा संर्दभात ग्रामविकास अधिकारी महेंद्रकुमार साबळे यांना विचारले असता विहिरीचे काम सध्यातरी बंद अाहे तसेच मशीनव्दारे होत असलेल्या कामाविषयी माहिती नसल्याचे सांगितले.