भोकरदन तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.राजेंद्र सपकाळ यांची बिनविरोध निवड.
जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील भोकरदन येथील वकील संघाचे सदस्य ॲड. राजेंद्र कडुबा सपकाळ यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी ॲड. संदीप वसंत दारूवाले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपाध्यक्ष म्हणुन ॲड. रविंद्र हनुमंतराव तळेकर तर सहसचिव पदी ॲड. गणेश गंगाधरराव देशपांडे यांची निवड करण्यात आली. त्या बाबत भोकरदन न्यायालयांच्या दिवाणी न्यायाधीश बजाज व सह दिवाणी न्यायाधिश जगदाळे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच तालुका वकील संघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले असुन निर्वाचन अधिकारी म्हणुन ॲड. एस यु गाढे यांनी काम पाहीले. त्यांना विनायक शास्त्री यांनी सहकार्य केले. सदर निवडणुक शांततेत पार पडली. याप्रसंगी ॲड. एस बी जाधव, ॲड. सि आर कुलकर्णी, ॲड. व्ही बी सपकाळ, ॲड. के बी तळेकर, ॲड. आर एस थारेवाल, ॲड. एन एम देशपांडे, ॲड. एस एस चौधरी, ॲड. एस एम साबळे, ॲड. डी एस जाधव, ॲड. बी बी वाघ, ॲड. एफ एच सिरसाट, ॲड. पि टी शिरसाट, ॲड. एम एस वडगांवकर, ॲड. जी एस ठोंबरे, ॲड. अनिल साबळे, ॲड. पी. एन कड, ॲड. वामन जंजाळ, ॲड. ए के शेख, ॲड. पी एस खरात, ॲड. आर एस दाभाडे, ॲड. आर के पाटील, ॲड. डी एस ठाले पाटील, ॲड. एम एस गाढे, ॲड.राहुल शिंदे, ॲड. राहुल सपकाळ, ॲड. प्रणव थारेवाल, ॲड. ज्ञानेश्वर रामफळे, ॲड. दिलीप कड, ॲड. एच ए नवाब, ॲड. शितल हिवाळे, ॲड. के एम शाह, ॲड. संदीप शिंदे, ॲड. सईद शेख, ॲड. शिला खराटे, ॲड. हितेश मेहता यांच्यासह सर्वांनी शुभेच्छा दिल्या.