श्रीराम मंदिर संस्थानचा अनोखा श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.

शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी श्रीराम मंदिर सभा मंडपसाठी दिला दहा लाखाचा निधी
दिपक हिवाळे /परतुर न्युज नेटवर्क
दोन वर्षाच्या कोरोना महामारीमुळे साधेपणाने साजरा झालेला श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.गेल्या दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षी अभुतपुर्व गर्दी या उत्साहाला होती.
श्रीराम मंदिर संस्थान परतुरचा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास अनेक वर्षाची परंपरा आहे यावर्षी सुध्दा हा जन्मोत्सव उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा झाला.सोंगाव्दारे रामाचा जन्मोत्सव सोहळा दृश्य रुपात भक्तासमोर दाखवला जातो ज्याव्दारे प्रत्यक्ष जन्मोत्सव सोहळा अनुभवन्याचे भाग्य आपणास लाभत आहे अशी श्रीराम भक्ताचा भावना निर्माण होते. ईस्काँनच्या भक्तमंडळीने भजनाचे आयोजन करुन या उत्साहात भर घातली.आपल्या खुमासदार शैलीत धनंजय जोशी सर यांनी कथा सांगितली.आजच्या या रामनवमीच्या मुर्हुतावर शिवसेना जिल्हा संघटक मोहनजी अग्रवाल यांनी भक्ताची गरज लक्षात घेता 10 लाख रु.सभामंडप देण्याची घोषणा केली.यावेळी सोहळ्यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोकराव आघाव , शहर प्रमुख विदुर जईद उपशहर प्रमुख दीपक हिवाळे लक्ष्मिकांत भैया कवडी ,अमोल सुरूंग, बाळू गाते,दशरथ राजे-कांतराव देशमुख,सुमंत प्रधान-शुभम सातोनकर,वशिष्ट ऋषी-प्रसाद बाप्ते,गंधर्व-शिवाजी काटे,शृंगऋषी-संजय सातोनकर,कांदे महाराज-सागर नंद रंभा-कु.आर्या कुलकर्णी तर भालदार-चोपदार श्रीपाद सातोनकर,प्रशांत डोम यांनी पात्र सादर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.गंगाधरराव पुराणिक, बाप्ते,अरुणराव शेपाळ,सुरेश नंद, दासोपंत पुराणिक संतोष नंदगोविंद सातोनकर,रामराव नंद,शामराव नंद,खंडेराव कुलकर्णी,सिध्दार्थ कुलकर्णी,विठ्ठल कुलकर्णी,गजानन सातोनकर,अंजिक्य पुरी आदीनी परिश्रम घेतले.ईस्काँन परिवारातर्फ फराळ वाटप करण्यात आला.