परतूर तालुका

जालना: कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात

परतूर प्रतिनिधी :

images (60)
images (60)

https://youtube.com/shorts/UKUOOoQBcAA?feature=share

कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाहनाला ट्रॅक्टरची धडक बसली . ही घटना बुधवारी रात्री परतूर वाटूर मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ घडली . या अपघातात चालक जखमी झाला असून , इंदुरीकर महाराज सुखरूप असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

विनोदाचार्य हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर हे बुधवारी रात्री बदनापूर येथून खांडवीकडे ( ता . परतूर जि.जालना ) वाहनातून ( क्र.एम.एच .१२ टी.वाय . १७४४ ) कीर्तनासाठी जात होते . त्यांचे वाहन वाटूर – परतूर मार्गावरील साईबाबा मंदिर परिसरात आल्यानंतर अचानक लाकडाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आल्याने अपघात झाला .

यामध्ये जीप चालक संजय गायकवाड हे गंभीर जखमी झाले . इंदुरीकर महाराज सुखरूप आहेत . अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले . अपघातग्रस्त वाहनातून महाराजांना तातडीने बाहेर काढून चालकास परतूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .

अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे किर्तन नियोजित वेळेत पार पडले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!