परतूर तालुका

वाढीव घरपटटीच्या विरोधात शिवसेनेचे पालीकेला कुलुप ठोकत अक्रमक अंदोलन !


सामान्यांची पिळवणुक अजिबात सहन करणार नाही – रामेश्वर नळगे
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
पालीकेच्या वतिने नवीन सर्वे नुसार आकारलेल्या वाढीव घरपटटीच्या विरोधात आज दिनांक २५ एप्रिल रोजी शिवसेनेने अक्रमक पवित्रा घेत चक्क पालीकेला कुलुप ठोकत आपला राग व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, माधवमामा कदम जिल्हाउपप्रमुख बाबासाहेब तेलगड ,तालुकाप्रमुख अशोक अघाव, महेश नळगे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सुर्दशन सोंळके, दत्ता सुरूंग, विदुर जईद, , लक्ष्मीकांत कवडी, शरीफ कुरेशी, गणेश नळगे, दिपक कदम, संतोश ढोम्बरे, अहमद चाउस, राहुल कदम, विठठल काकडे, अबासाहेब कदम, नसीर पठाण , समद अन्सारी, दिपक हिवाळे, तुळसीराम निकाळजे, अप्पासाहेब वटाणे, भुषन केजडीवाल ,विकास खरात, संदिप पाचारे, संतोश चव्हाण, बबलु गाते, कृष्णा कापसे, अमोल शहाणे, सतिष हजारे, सतीश राठौड़ , राहुल चव्हाण , शंकर एक्केवर , संतोष क़तारें ,गोपाळ माने, महालिंग स्वामी, रोहित अग्रवालसह असख्यं शिवसैनीकाच्या ताफ्याने पालीकेला वेढा घालत काही वेळ पालीका कार्यालयालयास कुलुप ठोकत अक्रमक अंदोल केले. यावेळी पालीकेचे मुख्याधीकारी यांनी मध्यस्ती करत शिवसैनीकांना व नेत्यांना पालीका दालनात बोलावत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेच्या वतिने वाढीव घरपटटी सह अनेक मागण्याचे निवेदन सादरी केले. दिलेल्या निवेदनात कोव्हीड मुळे सर्वेसामान्यांची परस्थिती नाजुक झाली असुन अनेकांचे हातावरचे काम गेल्याने बेरोजगारांचे प्रमाण वाढले असल्याचे म्हणत यावेळी जुन्याच दराप्रमाणे घरपट्टी आकारण्यात यावी ही रास्त मागणी निवेदनावर सादर करण्यात आली. यासह शहरातील मालमत्तेचे मुल्यंकन करतांना मालमत्ता धारकांची परवाणगी न घेता परस्पर मोजमाप करत पालीकेने नोंदी केल्याचा आरोप निवेदनावर करण्यात आला. या घरपटटी सर्वेषनात तत्कालीन नगराध्यांनी पक्षपात करत स्वताहाच्या जिनींग फॅक्टरी मोठी असताना कमी पट्टी आकारत एक प्रकारे प्रषासनाची दिशाभुल केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यात जुन्या ईमारतीचे मुल्यमापन न करता नवीन व जुन्या दराने सर्वाना एकत्रीत दर लावले ठराव सभेच्या जुन्या दर अकारणी बाबत विचार असतांना त्याची आमलबजावणी करण्यात आली नाही, या शिवाय घरपट्टीच्या निकषाप्रमाणे शहरात कुठलीच सुविधा पालीकेच्या वतिने मिळत नाही मग घरपटटी दर मोठया प्रमाणात का आकारली जाते असा सवाल निवेदनांत उपस्थित करण्यात आला. याबाबत गामभिर्याने विचार केला नाही तर शिवसेना रस्त्यवर उतरूण मोठे जनअंदोलन छेडणार असल्याचा ईशारा शेवटी निवेदनात देण्यात आला.
दरम्यान यावेळी मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी अंदोलकर्ते शिवसैनीकांना आश्वासन देतांना म्हटले की, याबाबत पुर्नविचार करत वाढीव घरप्टटी बाबत पारदर्षक दर कसे आकरण्यात येतील यासाठी वरिष्ठ अधिकारयांसोबत चर्चो करणार असल्याचे त्यांनी अभिवचन दिले तर सामान्यांची पिळवणुक आम्ही अजिबात सहन करणार नाही असा ईशारा शिवसेनेचे स्थानीक नेते रामेश्वर नळगे यांनी दिला.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!