परतूर तालुका

परतुर येथील नाफेड सेंटर मध्ये शेतकऱ्यांची लूट

images (60)
images (60)

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
राज्यातील शेतकरी अनेक कारणाने अडचणीत असतांना शहरातील छलानी जिनिंग मधील नाफेड सेंटर चालकाने चक्क हमालीच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटण्याचा सफाटा लावला असून याबाबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग शेजुळ यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला माल बाजारात विक्री करत असतांना अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही तसेच नाफेडच्या सेंटर चालकाकडून होणारी लूट पाहता याला आळा घालणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
तालुक्यातील छलानी जिनिंग मध्ये सद्यस्थितीत चालू असलेल्या नाफेडच्या सेंटर चालक का हमालीच्या नावाखाली हरभरा विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून चक्क प्रति क्विंटल १५० रुपये आकारणी करत आहे जे की नियमबाह्य असून याकडे बाजार समिती चे सुद्धा जाणूनबुजून दुर्लक्ष पाहायला मिळत आहे याबाबत निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक तत्काळ थांबवून त्यांच्याकडून हमालीच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम वापस करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे
लागेबांधे असलेल्या शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे तोडबघून विना चाळनी करून माल घेतला जातो याबाबत सविस्तर व निष्पक्ष चौकशी करून संबंधित नाफेड सेंटर चालकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ही श्री पांडुरंग शेजुळ यांनी केली आहे.

या सर्व प्रकरणा बाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना विचारपूस केल्यास त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन या प्रश्नांकडे बगल दिल्याचे पाहायला मिळाले


कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर.बि. लिपणे यांना संपर्क केला असता त्यांनी शासनाकडून असे कोणतेही आदेश किंवा परिपत्रक नाही की ज्यात शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घ्यावे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!