वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार
वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार वितरण करतांना मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यासह आदि मान्यवर दिसत आहेत.
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
शहरात महावितरणमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर प्रकाशराव भामट यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार दि १ मे कामगार दिनी औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर प्रकाशराव भामट यांनी महावितरणाच्या परिमंडळात काम करीत असतांना सण २०२१-२२ मध्ये अविरत विनाअपघात सुरळीत वीजसेवा, रोहित्राची काळजी, अचानक उदभवणार्या तांत्रिक समस्येचे त्वरित निराकरण करणे, कामाच्या ठिकाणची देखभाल, इत्यादि क्षेत्रात कर्तव्य दक्षता, निष्ठा व श्रम दाखवून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.