परतूर तालुका
परतूर येथे वैश्य सुवर्णकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा…

परतूर प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील परतूर शहरात वैश्य सुवर्णकार संघटनेच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदरील मेळाव्यात वैश्य सुवर्णकार समाजाचे इच्छुक वधू-वर सहभागी होणार आहेत. सदरील मेळावा दि.08/05/2022 रविवार रोजी वरद विनायक लॉन्स, परतूर येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. पालकांनी मेळाव्याला येतांना इच्छुक वधू अथवा वर यांना सोबत आणावे व त्यांचे टाईप केलेले बायोडाटा व 2 फोटो सुध्दा आणावे अशी माहिती देण्यात आली आहे. तरी सर्व वैश्य सुवर्णकार समाज बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैश्य सुर्णकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.