परतूर तालुका
मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे परतूर शहरातील रस्ते चकाचक
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नाने परतूर शहरतील प्रभाग क्र. ०८ मध्ये राहुल सातोनकर यांचे दुकान ते स्व. बाबुराव सातोनकर व्यायाम शाळे पर्यतच्या सिमेंट काँक्रीट रोडचे काम चालू असून सदरील कामासाठी मोहन अग्रवाल यांनी नगर विकास मंञी एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आला आहे.सदरील कामासाठी माजी नगरसेवक मोहन अग्रवाल व शोभाताई लड्डा यांनी खूप शर्यतीचे प्रयत्न करून निधी उपल्ब्ध केला आहे. अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे परतूर शहरातील अंतर्गत रस्ते चकाचक होत आहेत. प्रत्येक्षात सिमेंट रस्त्याचे काम सुरु झाल्यावर येथील नागरिकांनी अग्रवाल व सौ.लड्डा यांचे आभार मानले.