परतूर तालुका

शिवसेनेच्या वतीने योगेश कुलकर्णी यांचा सत्कार

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे कलाकार परतूर शहराचे भूमिपुत्र योगेश कुलकर्णी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपट) या चित्रपटात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका उत्कृष्टपणे निभावल्या बद्दल परतुर शिवसेनेच्या वतीने योगेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, विकास खरात, उपशहरप्रमुख दिपक हिवाळे, राहुल कदम, संदीप पाचारे,श्री ठोंबरे,व परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतिने सत्कार करण्यात आला. कोरोणा काळ संपल्यानंतर प्रथमच या मराठी चित्रपटाने २० कोटीचा गल्ला जमलेला असून सर्व महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे. योगेश कुलकर्णी हा परतूर येथील भुमी पुञ असून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका हुबेहुब साक्षात न्याय दिल्या बद्दल योगेश कुलकर्णी यांचा खरोखरच परतुर वासियांना आणि शिवसैनिकांना गर्व आहे. व हा चित्रपट सर्व नागरिकांनी चित्रपट गृहातच पाहून आनंद दिघे यांचे कार्य विचारात घ्यावे व खरोखरच योगेश कुलकर्णी यांचा आम्हाला गर्व आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी सत्कार यावेळी काढले. शहरवासीयांना खूप मोठा आनंद झाला असून कुलकर्णी यांचे कौतुक होताना दिसत आहे. या भूमिकेमुळे योगेश कुलकर्णी यांचे परतूर शहरात जागोजागी सत्कार करण्यात येत आहेत.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!