श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
परतुर प्रतिनिधी : परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र प्रमाणात परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल ९३%लागल्याने श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांनी स्वागत केले आहे.
या विषयी सविस्तर वृत असे कि मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेत ६२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती या पैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन विद्यालयातुन प्रतिक्षा गायकवाड ८६% गुण घेऊन प्रथम ,शरद खवल ८४%गुण घेऊन दुसरा तर सीमा गायकवाड ८३% गुण घेऊन तिसरी आली आहे. या सह १५ विद्यार्थीनी विषेस प्राविण्य मिळविले आहे .२३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १६ विद्यार्थी द्वीतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असुन ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
याबाबत बोलताना लोणीकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत आहे .कोरोना च्या महामारी मध्ये शाळा बंद असतांना देखील त्यांनी भरभरून यश संपादन केले आहे त्याबद्दल सर्व प्रथम त्यांचे अभिनंदन करतो व शिक्षकांना धन्यवाद देतो.
या वेळी महामंत्री राहूल लोणीकर , यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी खवल , सचिव गंगाधर काळें , अंकुशराव नवल , प्रभाकर कादे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या बद्दल माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करून लॉकडाऊन च्या काळात ऑनलाईन पद्धतीने तयारी केली त्यामुळे याचा फायदा झाला.
यश संपादन करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक गाडेकर , रोकडे ,खवल सातपुते , कुलकर्णी जोशी ,सी.एन.खवल डवरे ,खरात , गणेश वखरे यांनी परिश्रम घेतले.