पत्रकारांनी नैतिकमुल्य जपून पत्रकारीता करावी – पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रविंंद्र लोखंडे
भोकरदन :- प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील पारध बु येथे झालेल्या कै:राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल मध्ये मराठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहविचार सभा घेण्यात आली यावेळी सहविचार कार्यक्रमात बोलताना तालुकाध्यक्ष रविंंद्र लोखंडे आपले मनोगत व्यक्त करताना की म्हणाले पत्रकारिता करताना पत्रकारांनी नैतिकमुल्य जपून पत्रकारीता करावी सर्व पत्रकारांनी सहविचार करावा जेणेकरून पत्रकार बांधवांना बातमीची लिखाण करताना सोयीचे होईल. तसेच पत्रकारीता हा देशातील चौथा आधारस्तंभ असल्याने मोठी जबाबदारी असल्याने आपल्या लेखणीतून समाजापुढे मांडण्यांचा अधिकार आहे तसेच पत्रकारीता सर्वांत मोठा समाजाचा आरसा असून सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळून देण्याचा अधिकार पत्रकारांच्या लेखणीत आहे तसेच पत्रकाराने पत्रकारीतेबरोबर आपला जोडधंदा म्हणून व्यवसाय करावा असे मत व्यक्त केले.
तसेच यावेळी सहविचार सभेत पत्रकारांना आदर्श पुरस्कार देण्यात येणार , पत्रकारांनी निधी जमा करून गरीब कुटुंबाना देऊ आदी विषयावर भाषणे करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र लोखंडे , सचिव बाळकृष्ण उबाळे, विशाल अस्वार ,कैलास दांडगे, सैय्यद सलीम , सुभाष खडके , हरी बोराडे , योगेश काकफळे , संतोष मोकासे , सलमान शहा , समाधान तेलंग्रे , राम ढमाले , रामसिंग ठाकूर , सचिन वेंडोले , सलमान शहा ,हरिष सपकाळ , गणेश मुठ्ठे , ज्ञानेश्वर सपकाळ, हरिदास गवळी , गजानन देशमुख , तेजराव दांडगे, गणेश राजगुरु, रमेश जाधव, नारायण हिवाळे ,अनिल तांगडे , उमेश भालके , शकील भाई , संदिप सुरडकर.गणेश राजगुरू यांच्यासह पारध , वालसावंगी , धावडा , पिंपळगाव रेणुकाई , जळगाव सपकाळ, वडोदतांगडा , शेलूद , लेहा , आदी गावातील ५० ते ६०पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तरूणांचा सत्कार
पारध येथील युवक विकास बबनराव लोखंडे या २५ वर्षीय युवकाने सोने चँनलवर कौन बनेगा करोडपती हॉटसिट मालिकेतील चित्रपटात सहभाग घेवून गावाचे नाव उज्वल करून सहभागी झाल्याने चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येण्याचे धाडस निर्माण केल्याने मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रविंद्र लोखंडे यांच्यासह पत्रकार बांधवाकडून शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.