जालना जिल्हा

वीज कोसळण्यापूर्वी माहिती देणारे “दामिनी ॲप” शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी वरदान

जालना :- पावसाळयामध्ये वीज पडण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात.  वीज पडण्याच्या घटनेमध्ये बहुतांशवेळा ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी जिवीत हानी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना वित्तहानीलाही सामोरे जावे लागते. वीज पडण्याची माहिती अगोदरच मिळाली तर होणाऱ्या जिवीत व वित्तहानीला टाळता येऊ शकते. स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट सत्यामध्ये उतरली आहे.  वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे आता आपल्याला माहिती देणाऱ्या सॉफ्टवेअरची भारत सरकारने निर्मिती केली असुन “दामिनी” ॲप या नावाने हे ॲप आता विनामूल्य प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी हे ॲप वरदान ठरणार असुन प्राधान्याने हे ॲप डाऊनलोड  करुन घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

images (60)
images (60)

    प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना “दामिनी”  ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या ॲपचे जीपीएस लोकोशनचे काम करीत असून वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवतालच्या वीज पडत असल्यास ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. ग्रामीण भागातील सर्व नागरिक, शेतकरी, गुराखी, मेंढपाळ यांनी “दामिनी”  ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. “दामिनी”  ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्लटनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देवून, होणारी जीवीत व वित्तहानी टाळावी.

       

     नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी “दामिनी”  ॲप अवश्य वापरावे.  “दामिनी”  ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!