परतूर तालुका

तात्कालीन मुख्याधिकारी चिंचाळकर, नगराध्यक्षा विमलताई जेथलिया आणि गुंजाळ असोसिएट यांनी संगणमत करून  १ कोटी ७२ लाखाचा भ्रष्टाचाराचा केला -माजी नगर सेवक अंकुश तेलगाड

images (60)
images (60)

 परतुर नगरपालिकेने वाढविलेल्या घरपट्टी संदर्भात राष्ट्रवादी-कग्रेस कोर्टात


परतूर न्युज नेटवर्क / दिपक हिवाळे

परतूर नगर परिषदेने बेकायदेशीर वाढविलेली घरपट्टी व चुकीच्या पध्दतीने केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाच्या संदर्भात माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे यांनी उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. वरद विनायक मंगल कार्यालय परतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेत विनायक काळे यांनी सांगितले की परतूर शहरातील जनतेला लावलेल्या भरमसाठ घरपट्टीमुळे शहरातील नागरीक त्रस्त आहेत.चुकीचे सर्वेक्षण नियमबाह्य पध्दतीने केले, तसेच घरपट्टी लावतांना झोन पाडले, या बद्दल नागरीकांना काहीही माहिती दिली नाही. ज्याच्या घरांचे सर्वेक्षण झाले त्यांना सविस्तर सांगणे जरुरी होते. तसेच सर्वेक्षण झालेल्या कागद पत्रांवर मालमत्ता धारकांची स्वाक्षरीआवश्यक होती त्या घेतल्या गेल्या नाही. तसेच आर. एस. कन्स्ट्रक्शन या खाजगीसंस्थेमार्फत सर्वेक्षण केले. एकाच मालमत्तेच्या ५ ते ६ भाग करुन घरपट्टी आकारणी केली, ज्यांच्या नावावर घर नाही, अशांना घरपट्टी अकारणी नोटीस दिल्या, काही भाडेकरुंना मालमत्ताधारक घरपट्टी नोटीस दिल्या आहेत. वडीलांच्या नावे नगरपरिषदेमध्ये घराची नोंद असतांना मुलाचे नावे आकारणी व नोटीस देण्यात आली यांच्यानावे मालमत्ता आहे, त्यांच्या ऐवजी त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना मालमत्ता कराची वसूली नोटीस दिली त्यामुळे कुटूंबात वाद निर्माण होऊन आपसात तेढ निर्माण झाले. मालमत्ताधारकांचे क्षेत्रफळ कमी अधिक दर्शविण्यात आले, सारख्या असंख्य चुका मालमत्ता कराच्या आकारणी मध्ये आहेत. या प्रकरणात परतूरच्या जनतेत न्याय मिळवून देण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. परतूर शहरातील धार्मिक स्थळ व नगर पालिकेच्याअतिक्रमीत जागेवर सुध्दा वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. 

परतूर नगर परिषद म्हणजे भ्रष्टाचाराचे नंदनवन – तेलगड

परतूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विमलताई जेथलिया याच चुकीच्या सर्वेक्षण व वाढीव घरपट्टीला जबाबदार आहेत.  सुरेशकुमार जथलिया हे परतूरच्या नागरीकांची दिशाभूल करत असून स्थगिती मिळाली, मी वाढव घरपट्टी रद्द करतो असे सांगतात, जे की, त्यांच्या सहमतीने घरपट्टी वाढ झालेली आहे. त्यांनी वेळीच लक्ष घातले असते तर जनतेला वाढीव घरपट्टीचा त्रास झाला नसता, असे माजी नगरसेवक अंकुश तेलगड यांनी पञकार परिषदेत सांगीतले पुढे म्हणाले की,परतूर नगर परिषद कार्यालयात चिरी मिरी दिल्या शिवाय नागरीकांचे कामे होत नाहीत, परतूर शहरात मागच्या ०५ वर्षापासून भुमिगतगटार योजनेचे काम सुरु असल्यामुळे नाल्या अस्तीत्वात राहिल्या नाहीत,मधोमध खोदकाम केले त्याचा प्रचंड त्रास नागरीकांना होत आहे. स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालेला असून धुर फवारणी सुध्दा झालेली नाही. नगर पालिकेने बांधलेली सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व स्वच्छतेच्या अभावी बंद आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.रस्त्याच्या शहरामध्ये मागच्या ०५ वर्षात अत्यंत निकृष्ठ दर्जाचे विकास कामे झालेली असून एक- दोन पावसातच सदरील रस्ते वाहून जाणार आहेत, तसेच शिवाजी नगरचा रस्ता ०३ वेळेस करण्यात आला, सांस्कृतिक सभागृहाचे काम सुध्दा निकृष्ठ दर्जाचे झालेले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. नगर पालिकेने राबविलेल्या नविन पाणीपुरवठा योजनेमध्ये नविन पाईपलाईन न टाकल्यामुळे काही भागात दुषीत पाणी पुरवठा वअपूरा पाणीपुरवठा होतो. धरणात मुबलक पाणी असतांना जनतेला पिण्याच्या पाण्या पासून वंचित रहावे लागते. परतूर शहरातील नगर परिषदेने राबविलेल्या घरकुल योजना मध्ये निकृष्ठ दर्जाचे बांधकामे वखार महामंडाळा जवळ झाली असून त्या २०० घरांच्या बांधकामाची जिल्हाधिकारी यांनी स्वतः चौकशी केली आहे व ही घरे राहण्या योग्य नसल्यामुळे त्या ठिकाणी आजही कोणीच राहत नाही. त्यामध्ये संबंधीत कंत्राटदार  व त्या वर देखरेख करणारी संस्था यांच्यावर भ्रष्टाचाराचा परतूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झालेलाआहे. यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. नगर परिषद मागील ३० वर्षा पासून सुरेशकुमार जेथलिया यांच्या ताब्यात असून पंतप्रधान घरकुल योजनेत तात्कालीन मुख्याधिकारी चिंचाळकर नगराध्यक्ष विमलताई जेथलिया व गुंजाळ असोसिएट यांनी संगनमत करून १ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेत तेलगड यांनी केला. परतूर शहरात शहर वासियांना त्यांच्या मुलभूत सोई सुविधा मिळत नाहीत, यामध्ये सुरेशकुमार जेथलिया हे सफसेल अपयशी ठरलेलेआहेत.

परतूर नगर परिषद म्हणजे जेथलियासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी – कपिला आकात
परतूर नगर परिषद ही जेथलिया  परिवारा करिता सोन्याची अंडे देणारी कोंबडी असून हे सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता अशा समिकरणाने यांचा कारभार चालतो नगरपालिकेने राबवलेल्या विविध योजना मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. व नागरिकांची दिशाभूल करत आलेले आहेत परतूर नागरिकांशी काहीही देणे घेणे नाही भ्रष्टाचार करायचा पैसा काढायचा आणि निवडणुका आल्या की पैसे देऊन निवडून यायचे यांना नागरीकांशी काहीही देणे घेणे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने परतूर नगरपालिका स्वबळावर लढवणार असून नागरिकांनी या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची विनंती पत्रकार परिषदेत कपिल आकात यांनी केली.पालक मंञी राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवा जिल्हा अध्यक्ष कपिल आकात, यांच्या नेतृत्वात परतूर नगरपरिषदेची येणारी निवडणूक स्वबळावर लढणार आहेत, २३ वार्डामध्ये २३ पैकी २३उमेदवार राष्ट्रवादी देणार आहे. राज्यामध्ये जरी महाविकास आघाडी असली तरीही परतूर नगर परिषदे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाशीच आघाडी किंव युती न करता स्वबळावर व पूर्ण ताकदीने निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा नगर परिषद परतूर वर फडकवणारआहेत. माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे आज रोजी पत्रकार परिषदेत यांनी ही माहीती दिली. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष कपिल आकात माजी नगराध्यक्ष विनय काळे नगरसेवक अंकुश तेलगड माजी नगरसेवक अखिल काजी , आरेफ अली कदीर कुरैशी व आदी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!