सोयगाव देवी गावात पिसाळलेल्या माकडाचा दिवसा धुमाकुळ,गावात घबराटीचे वातावरण,शाळाही बंद
माकडाचा हल्ल्यात जखमींवर रुग्णालयात उपचार चालू आहे
भोकरदन : मधुकर सहाने
भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी परिसरात पिसाळलेल्या माकडाने दोन दिवसापासुन धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांना हातात काठी, कुऱ्हाड घेतल्याशिवाय बाहेर पडणे अशक्य झाले आहे.सोयगाव देवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला असुन या माकडाच्या हल्ल्यात सोयगाव देवी
येथिल नाना इंगळे यांना माकडाने डाव्या पायाचा लोचका तोडुन गंभीर जखमी केले असुन त्यांना प्रथम उपचारासाठी भोकरदन येथे येथे हलवण्यात आले होते आणि नंतर पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले.
माकडाच्या हल्ल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत गावात माकडाची दहशत निर्माण झाली असुन माकड केव्हा येईल अन् हल्ला करेल या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले आहेत शेतात जाण्यासाठी काठी हातात घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे, आणि शनिवारी या माकडाच्या धास्तीने शाळाही बंद ठेवण्यात आली होती.