परतूर तालुका

छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कुलमध्ये चिमुकल्या वारकर्‍यांची दिंडी

images (60)
images (60)

दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

परतुर शहरातील छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्या वारकर्‍यांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. त्यातील वारीची ही परंपरा तसेच संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावे व वारीचा प्रत्यक्ष अनुभव यावा आणि आपल्या देशाची संस्कृती कृतीतुन जपावी याकरिता या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्यध्यापिका सुवर्णा आवचार यांनी बोलताना दिली आहे. यावेळी चिमुकल्या मुले व मुली विठ्ठल रुक्मिणी महाराष्ट्रात विविध संत यांच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. दिंडीत हातात टाळ घेऊन विठूरायाच्या गजर करत दिंडी काढली. सदरील दिंडी सोहळामध्ये संस्थेचे अध्यक्ष सिध्देशवर आवचार, मुख्यध्यापिका सुवर्णा आवचार, शिक्षिका भाग्यश्री बागुल, प्रिया खरात, शिपाई श्रीमती गिराम यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!