परतूर तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश…
मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वात शिंदे गटात सामिल...
परतूर तालूक्यातील शिवसैनिकांचा मोठा जत्था मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वात शिंदे गटात सामिल...
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
कट्टर हींदुत्वाच्या मुद्यावर वेगळा शिवसेना गट शिंदे यांनी तयार केल्या नंतर शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांची मंञालय मुंबई येथे तालुक्यातील समर्थकासह भेट घेउन पांठीबा दिला असता, ता.२४ रोजी परतूर तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिका-यांनी स्वंयस्फुतीने मोहन अग्रवाल यांची भेट घेउन शिंदे सरकारला पाठींबा दिल्याचे कबुल करून शिंदे गटात प्रवेश केला.
यामध्ये सातोना सर्कल माजी विभाग प्रमुख व माजी सरपंच सोपानराव कातारे पाटील, वरफळ पंचायत समिती विभाग प्रमुख गंगाधर गोरे, निवृती कुकडे ,बालाजी बोडखे ,प्रकाश कुकडे शाखा प्रमुख गजानन खिल्लारे, प्रेम हजारे अशोक खिल्लारे ,शेख रशिद शेख ईब्राहीम व विशाल शेवाळे यांनी मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वात शिदे गटात प्रवेश घेतला.या प्रसंगी शिवसेना तालुका संघटक तथा सरपंच वलखेड भगवान सुरूंग, श्रीष्टी विभाग प्रमुख अमोल सुरंग, आष्टी विभाग प्रमुख नितीन राठोड, दत्ता अंभुरे , ग्रामपंचायत सदस्य दत्ता अंभोरे, शहर उपप्रमुख दीपक हिवाळे, शहर उपप्रमुख सतीश हजारे व आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.