परतूरात शिंदे गटाचा प्रवेशाचा धुमधडाका ! मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर नागरीकांचा विश्वास
परतुर शहरातील व तालुक्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, माजी सरपंच ,शिवसैनिकांचा मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंञी एकनाथराव शिंदे साहेब यांच्या गटाला जाहीर समर्थन सुरुच…
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतुर तालुक्यातील व जिल्ह्यातील शिवसेनेचे धडाडीचे ज्येष्ठ नेते शिवसेना जालना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या गटात सहभागी होऊन समर्थकासह यापूर्वीच पाठिंबा जाहीर केलेला आहे .
आज परतुर तालुक्यातील डोल्हारा येथील शिवसेना शाखाप्रमुख रामेश्वर काटकर, आबासाहेब निंबाळकर, माजी सरपंच डोलारा ,अश्रूबा निंबाळकर उपसरपंच डोल्हारा , आयुब खान पठाण ग्रामपंचायत सदस्य डोल्हारा, सोनू डोल्हारकर शाखाप्रमुख जुना पोस्ट ऑफिस रोड परतुर,दिनेश चिकने शाखाप्रमुख व्यंकटेश नगर परतूर, राम चिखले, प्रल्हाद गुंजाळ, विष्णू वाघमारे ,बाळू वाघमारे, रमेश चिखले, योगेश शिंदे, मदन पाष्टे, गणेश चिखले,
तसेच परतूर शहरातील अजय शिंदे, दिनेश साबळे यांच्यासह अनेक शिवसैनिक व शाखाप्रमुख यांनी मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ना.एकनाथरावजी शिंदे यांना समर्थन दिले आहे समर्थन देणारे पदाधिकारी हे मूळचे शिवसेनेचे शाखाप्रमुख व शिवसैनिक आहेत.