घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

काय तो रस्ता.काय ते वाहन..काय ती ट्राफिक..सगळं एकदम ओके…

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना; नागरीक हैराण

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील अंबड-पाथरी टि पॉईंट,पोलीस चौकी,प्रियदर्शनी बँक,महाराष्ट्र बँक,महाराणा प्रताप चौक,ते बसस्थानकापर्यंत ठिकठिकाणी अरूंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूकीची कोंडी होत आहे.
त्यातच दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहने भर रस्त्यावर तासनतास उभी करीत असल्याने पादचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याकडे पोलीस प्रशासनासह ग्रामपंचायत ही सपशेल अपयशी ठरत आहे.
कुंभार पिंपळगाव हे तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे.परीसरातील नागरीक आर्थिक देवाण-घेवाण व खरेदीसाठी बाजारपेठेत येत असतात.परिणामी रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग व रस्त्यावर उभी असलेल्या वाहनामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणे अवघड झाले आहे.
दरम्यान, कुंभार पिंपळगावात दर बुधवारी आठवडे बाजार भरत असतो.या आठवडे बाजारात परीसरातील नागरिक खरेदीसाठी येतात.प्रत्येक दुकानासमोर,रस्त्यावर दुचाकी, व चारचाकी वाहने वाहनधारक तासभर उभी करून बिनधास्त होतात.
त्यामुळे सतत वाहतूक कोंडीचा प्रश्न सतावत आहे.
या रस्त्यावर एरवी नाही पण किमान बुधवारी आठवडे बाजाराच्या दिवशी तरी पोलिसांची नियुक्ती केल्यास नागरीकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरीकांकडून टव्यक्त करण्यात येत आहेत.
याकडे संबंधित पोलिसांनी लक्ष देऊन वाहतूक कोंडीची समस्या तत्काळ दूर करावीत अशी मागणी ग्रामस्थ व्यापारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!