घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

यावलपिंपरी येथील जिल्हा परिषद इमारतीची दुरवस्था; नवीन इमारत बांधकाम करण्याची तहसीलदार यांच्याकडे मागणी

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील यावलपिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झालेली असून इमारतीला पूर्ण तडे पडल्याने मोडकळीस आलेली आहे. नवीन इमारत बांधकाम मंजूर करून जुन्या वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाटीलबा उगले यांनी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, यावलपिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिले ते सातवीपर्यंत वर्ग असून एकुण पाच वर्ग खोल्यात विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत.पाच वर्गखोल्यापैकी तीन वर्ग खोलीची इमारत मोडकळीस आलेली असून पावसाळ्यात या इमारतीला पाण्याची मोठी गळती लागत आहे.
पाच पैकी फक्त एकच खोली सुव्यस्थित असल्याने यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.येथील शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था अपूरी पडत आहे. शाळेला नवीन इमारतीचा आवश्यकता दोन जून्या इमारतीची देखभाल दुरूस्ती करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत व जून्या इमारतची देखभाल दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाटीलबा उगले यांनी तहसीलदार यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!