देश विदेश न्यूजब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्र न्यूज

दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूचा कहर, 28 जणांचा मृत्यू

images (60)
images (60)

अहमदाबाद : गुजरातमध्ये बनावट दारूमुळे मृतांचा आकडा 28 वर पोहोचला आहे. तर 47 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. बोताडच्या बरवालाशिवाय अहमदाबादमधील चार जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.
बोताड येथे रविवारी रात्री बनावट दारू प्राशन केल्याने अनेकांची प्रकृती बिघडली होती. संध्याकाळी बनावट दारूमुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. भावनगर रेंजचे आयजी अशोक यादव यांनी या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्याचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक करणार आहेत.
विधानसभेपूर्वी झालेल्या विषारी दारूकांडामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्ट्राचाराचा थेट आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गांधीजींच्या गुजरातमध्ये दारूबंदी असताना गावोगावी अवैध दारू विकली जात आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!