गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूटीने राहावे-आ.राजेश टोपे

तिर्थक्षेत्र जांबसमर्थ येथे विविध विकासकामाचे भूमिपूजन
जालना प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील तिर्थक्षेत्र जांबसमर्थ हे गांव समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे, ह्या गावाला मोठा इतिहास आहे त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी हेवेदावे विसरून एकत्र रहावे असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी शुक्रवारी (दिं22) विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.
यावेळी नाट्यलेखक ,अभिनेते राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे, घनसावंगीचे नगराध्यक्ष पांडुरंग कथले, कल्याणराव सपाटे, बन्सीधर शेळके, भागवत सोळंके, रमेश धांडगे, सुशील तौर, नकुल भालेकर, गोपाल राजूरकर, विजय कंटूले, नाजेम पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्री.टोपे म्हणाले की, या तीर्थक्षेत्राला ग्रामीण पर्यटनाचा “ब”दर्जा मिळाला असून शासन दरबारी अनेक विकासकामांचा पाठपुरावा करू येणाऱ्या काळात राबविण्यात येणाऱ्या कामांना निधी कमी पडू देणार नाही. परंतु विकास कामांत कुठेही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे, सुरू होत असलेली सर्वच कामे उत्कृष्ट दर्जाची होतील यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहून एकत्रित येऊन त्याकडे लक्ष द्यावे.
दरम्यान राज्यमार्ग 61 जांबसमर्थ ते परतूर तालुका सरहद्द राज्यमार्ग 223 या 6 किमी रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रुपये तर गावांतर्गत विकासासाठी विविध योजनेतून 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच गुणांनाईक तांडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 69 लक्ष रुपये तर वसंतराव नाईक तांडा सुधार वस्ती योजनेअंतर्गत विविध कामासाठी 50 लक्ष रुपये, दोन नवीन अंगणवाडी खोली बांधकामासाठी 22 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे या सर्व कामाचे भूमिपूजन श्री.टोपे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला सरपंच बाळासाहेब तांगडे, उपसरपंच अरविंद पवार , माजी सरपंच धनंजय देशपांडे, समर्थ मंदिर संस्थानचे सहसचिव संजय तांगडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गणकवार, मारोती पवार, ग्रामविकास अधिकारी कल्याणराव भोजने, परमेश्वर गणकवार, सिद्धार्थ गणकवार, दीपक तांगडे, सुदर्शन तांगडे, संदीपान तांगडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.