वलखेड येथे मुलभूत सुविधेचा अभाव सरपंच ग्रामसेवकाचे दुर्लक्ष ?
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
तालुक्यातील मौजे वलखेड गावातील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरदर्शा झाली असून सर्वच रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत तसेच येथे विद्युत व पाण्याच्या समस्या बद्दल सरपंच व ग्राम सेवक दुर्लक्ष करीत असल्या बाबत संबधित गावक-यांनी परतूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, मौजे वलखेड गावातील गावांतर्गत रस्ते पूर्ण खड्डेमय झाले असून मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामुळे अनेकअपघात याठिकाणी घडत असतात. तसेच राञंदिवस विजेचा लपंडाव सुरू असतो रस्त्याची दुर्दशा झालेली असून येणाऱ्या जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना या खड्ड्यामुळे खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वच रस्ते चिखलमय झालेले आहेत यामुळे नागरिकांना गावात फिरणे मुश्किल झाले आहे मौजे वरखेड गावात सर्व मूलभूत सुविधांचा अभाव असून संबंधित समस्या विषयी सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार तक्रार करूनही सरपंचाकडून व ग्रामसेवकाकडून उडवा उडवीचे उत्तरे मिळत आहेत.
तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन गावाची पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन गावकऱ्यांच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती परतुर, ग्रामविकास मंत्री मुंबई, जिल्हाधिकारी जालना यांना निवेदनाच्या प्रती दिल्या असून दिलेल्या निवेदनावर दत्ता अंभूरे ,बाबासाहेब डव्हारे, आबासाहेब डव्हारे ,उद्धव डव्हारे ,पांडुरंग सुरूंग ,विष्णू काकडे, रवी सुरूंग ,सखाराम डव्हारे, कांताबाई शेळके ,रमेश सुरुंग,कृष्णा बिल्हारे, महादेव सुरूंग, कैलास सुरूंग, कैलास बिल्हारे, राम बिल्हारे, दादाराव डव्हारे, केशव डव्हारे, संतोष सुरुंग ,शकुंतला सुरुंग, दादाराव डव्हारे, केशव डव्हारे, विश्वनाथ डव्हारे व आदी गावकऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत. व्हीडीओ पहा