परतूर तालुका

अरुण गायकवाड मुळे युवकाच्या उपचारास रू. ४८ हजार ८५० ची मदत


दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)


येथील रेल्वे स्टेशन परीसरात राहणारा रेल्वेमध्ये पाणी बॉटल विकून स्वतःचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवनारा युवक महेश शेळके याच्या डोक्यातील नस दबल्यामुळे मुंबई येथे हाँस्पिटल मध्ये दाखल केले असता त्याला ऑपरेशन साठी खूप खर्च येणार आहे,त्यांची परीस्थिती गरीबीची असल्यामुळे हा खर्च पेलण्याची परिस्थिती नसल्यामुळे सामाजीक कार्यात सदा आग्रेसर असणारा साठेनगर मधील युवक अरुण नामदेवराव गायकवाड यांच्या पुढाकाराने परिसरातील युवकाच्या सहकार्याने महेश शेळके याच्या उपचारासाठी आज ता.३०/०७ रोजी परतूर शहरात मदत फेरी काढण्यात आली.ही फेरी रेल्वे स्टेशन पासून ते मोंढा बाजार,गाव बाजार, साईबाबा रोड पर्यंत काढण्यात आली..
या फेरी दरम्यान परतूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यात ४८ हजार ८५० रुपये जमा झाले. व फोन पै द्वारेसुध्दा काही रक्कम जमा झालेली आहे.जमा झालेली रक्कम त्याच्या आई वडीला कडे देण्यात येणार आहे.
यामध्ये अरुण नामदेवराव गायकवाड, नरेश कांबळे, अकबर शेख, वाहेद शेख,नवीन पठाण,राजू , नरेश सोनवणे, गजानन तीर्थे,शुभम कठोरे, कृष्णा शेंडगे, संतोष चव्हाण, सागर दळवी, अजय आवलकर, सौद चाऊस, संपत हिवाळे, दिनेश चिकणे, एजास शेख, विकास आवारे, आकाश आवारे, संदीप आवारे,सोहेल शेख, उत्तम तिर्थ, समीर शेख, शुब्बु शेख, संतोष कदम, प्रभू गुंड, वैजनाथ कावळे, पवन सावस्के, श्याम कारके, सचिन ठोंबरे, राम लोखंडे, संघपाल दाभाडे, राहुल सावस्के, सचिन कठोरे, श्याम सावसके, रियाज शेख, प्रकाश शिंदे, संतोष घारे,अशोक चिकणे, किशोर सावस्के, सोहेल पठाण, शोएब पठाण, कृष्णा कोयते, विकास बासनवाळ,महादेव बासनवळ,विकास आवटे, सुशांत दळवी, सलमान पठाण, अकबर शेख,व सोहेल पठाणसह आदी युवकांनी मदत फेरी मध्ये सहभाग नोंदवला होता.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!