परतूर तालुका

आजही शिंदे गटात अनेकांचा प्रवेश!

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

आज मोहन अग्रवाल यांच्या निवासस्थानी परतुर तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुणराव धुमाळ यांचा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या गटात मोहन अग्रवाल व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. अरुण धुमाळ हे शेवगा येथील ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक असून गेल्या ३७ वर्षापासून परतूर तालुक्यात शिवसेनेचे काम करीत आहेत. त्यांनी स्वर्गीय नाशिकराव मुळे व स्वर्गीय सुधाकर रावजी खवणे यांच्यासोबत शिवसेना वाढविण्यासाठी काम केलेले आहे. त्याचबरोबर येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास वटाणे व युवासेनेचे मंगेश वाटाणे यांनीही मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी वलखेडचे उपसरपंच भगवानराव सुरूंग ,उपशहर प्रमुख सतीश हजारे, बाबासाहेब चिखले, व दत्ता अंभुरे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!