घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
राजाटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना माजी सरपंच रामेश्वर काळे
व शंकर हिवाळे
यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला सरपंच डिगु आर्दड, उपसरपंच विष्णुपंत आर्दड,ग्रामविकास अधिकारी विनोद भगत, तलाठी राजू शेख,माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र आर्दड,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आर्दड,माजी सरपंच शेषराव आर्दड,विष्णुपंत आर्दड,करण खरात,बबलु आर्दड,बाबासाहेब हिवाळे, अर्जुन तौर,सर्जेराव माने,रामा हिवाळे, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.